त्यानुसार त्यांनी तात्काळ एक पथक तयार करून त्या ठिकाणी कारवाईचे आदेश दिले. सदर पथकाने ठरलेल्या ठिकाणी सापळा रचून मोटरसायकल वरील दोघांना अडवून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे – १) चरणसिंग उखा चव्हाण (वय ३६, रा. चौडी, ता. ब-हाणपूर, म.प्र.) २) पंकज रतनसिंग चव्हाण (वय २५, रा. मोरझिरा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) अशी सांगितली. अंगझडती दरम्यान एक गावठी बनावटीचा पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे, सदर पल्सर मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ₹१,२९,००० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सदर दोघांकडे कोणताही परवाना नसून ते बेकायदेशीररीत्या दहशत माजविण्याच्या उद्देशाने हे शस्त्र बाळगत होते. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९४/२०२५ अन्वये आर्म अ‍ॅक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

One thought on “Hello world!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *